म्हाडा झाला आहे मालामाल

February 15, 2009 10:18 AM0 commentsViews: 4

15 फेब्रुवारी मुंबईउदय जाधवमुंबईतील 3500 घरं म्हाडानं विक्रीला काढली. त्यासाठी अर्ज भरताना मुंबईकरांनी म्हाडाला जे पैसे डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत त्याचा आकडा आहे. 13 कोटी. मंदीतही लोकांच्या बजेटची तेजी दाखवणारा असा हा आकडा आहे.म्हाडाच्या अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च या चार स्किमसाठी 4,34,215 अर्ज आले आहेत. या सर्व अर्जांचे डिपॉझीट होतं 13,077कोटी 6 लाख85 हजार रुपये. मुंबईत म्हाडाने 3863 घरं कमी किमतीत उपलब्ध करून दिली. आणि या घरांसाठी 7,55,793 अर्जांची विक्री झाली. त्यासर्वांची किंमत7 कोटी55 लाख180हजार 300 रुपये होते. म्हाडानं अर्ज विकणं आणि स्वीकारणं याचं कॉन्ट्रॅक्ट एचडीएफसी बँकेला दिलं होतं. या बँकेत म्हाडाचं खातं आहे. तसंच म्हाडा तीन महिन्याच्या आत सर्व अर्जदारांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या या योजनेनंतर बिल्डरांना लक्षात आलं की मुंबईत स्वत:च्या घरासाठी प्रचंड ग्राहक आहे. मंदी असली तरी घर खरेदी करायला साडे चार लाख लोक तयार आहेत हे या आकड्यावरून दिसतंय.

close