शालेय सहलीच्या बसला भीषण अपघात, 6 विद्यार्थीचा मृत्यू

December 7, 2013 3:58 PM0 commentsViews: 2440

bus accident07 डिसेंबर : तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर एक शाळकरी बस आणि एका खाजगी ट्रॅव्हलमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये 6 विद्यार्थी आणि एका ड्रायव्हरचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातल्या सांर्गुडे प्राथमिक विद्यालयाची ही सहल होती. तुळजापूर येथे दर्शनाला जात असताना सांगवीपाटी गावाजवळ हा अपघात झाला.

अपघात इतका भीषण होता की ट्रॅव्हल्सच्या बसच्या धडकेनं शाळकरी मुलांच्या बसचे दोन तुकडे झाले अपघातात 8 जण जखमी झालेत. त्यांना तुळजापूरमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. काही जणांना पुढच्या उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आलंय.

close