तेजपालच्या पोलीस कोठडीत 4 दिवासांची वाढ

December 7, 2013 3:56 PM0 commentsViews: 97

tejpal07 डिसेंबर : लैंगिक अत्याचार प्रकरणी तहलकाचा माजी संपादक तरुण तेजपालच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आज शनिवारी त्याला गोव्यातल्या कोर्टात हजर करण्यात आलंय.

आणखी चौकशी करायची असल्यानं तेजपालची कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र तेजपालच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला. पण कोर्टाने पोलिसांची मागणी मान्य करत तेजपालच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली.

दरम्यान, पोलिसांनी तेजपालविरोधात एफआयआरमध्ये आणखी गुन्हे दाखल केलेत. तर दुसरीकडे तहलकाची माजी मॅनेजिंग एडिटर शोमा चौधरी आपला जबाब नोंदवण्यासाठी गोवा कोर्टात हजर झालीय.

close