पट्टाया ओपनच्या फायनलमध्ये सानियाचा पराभव

February 15, 2009 1:43 PM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारीभारताची नंबर वन महिला टेनिसपटू सानिया मिर्झाचा पट्टाया ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव झाला आहे. फायनलमध्ये रशियाच्या व्हेरा झोनेरेव्हानं सानियाचा 7-5, 6-1 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. 2007 च्या स्टॅनफोर्ड क्लासिक स्पर्धेनंतर सानियानं पहिल्यांदाच डब्ल्यूटीए स्पर्धेच्या फायनलपर्यंत धडक मारली होती. 2005मध्ये तीनं हैद्राबाद ओपन स्पर्धा जिंकली होती.सानियाच्या करिअरमधील हे एकमेव टायटल आहे. पण ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेनंतर तीनं तिचा फॉर्म परत मिळवलाय असचं दिसतयं. महेश भूपतीबरोबर सानियानं ऑस्ट्रेलियन ओपन मिक्स डबल्सचं जेतेपद पटकावलं होतं. आणि त्यानंतर आता पट्टाया ओपनच्या फायनलपर्यंत धडक मारण्याची कामगिरी तिनं केली. त्यामुळे रँकिंगमध्ये शंभराच्या बाहेर फेकली गेलेली सानिया पुन्हा एकदा टॉप पन्नासमध्ये कमबॅक करेल हीच अपेक्षा टेनिस फॅन्सना वाटत आहे. त्याचबरोबर महिलांच्या डबल्स स्पर्धेत सेमी फायनलमध्येच सानियाला पराभव पत्करावा लागला होता. मारिया सॅन्टअँजलोच्या साथीने खेळताना शेडोव्हा आणि तॅनासुगान यांनी त्यांचा 2-6 ,6-2 आणि 10-7 असा पराभव केला.

close