‘बाळासाहेब’ राज यांच्या घरी !

December 7, 2013 7:26 PM0 commentsViews: 4988

raj and balasaheb07 डिसेंबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या निवासस्थानी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक शिल्प बनवून घेत आहे. अर्धाकृती हे शिल्प आहे. राज ठाकरे स्वत: जातीने लक्ष घालून हे शिल्प बनवून घेत आहे. मुंबईतल्या सोनावणे बंधुंकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलीय. या शिल्पावर सूचना घ्यायला हे शिल्पकार आज राज यांच्या निवास्थानी आले होते.

‘तो राज, माझ्या अंगा,खांद्यावर खेळला’ हे वाक्य आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं. बाळासाहेबांनी आपल्या जाहीर सभांमधून राज यांच्या आठवणींनी उजाळा द्यायचे. आणि बाळासाहेब तुमच्यासाठी शंभर पावलं पुढं येईन असं प्रतिउत्तर देणार त्यांचे पुतणे राज ठाकरे.

बाळासाहेब ठाकरे आणि राज यांचं नातं समस्त महाराष्ट्राला माहित आहे. बाळासाहेबांचं राज यांच्यावर किती प्रेम होतं हे अनेक सभांमधून सर्वांनी पाहिलंय. आता या नात्याची आठवण म्हणा अथवा प्रेम…राज ठाकरे आपल्या निवास्थानी जपणार आहे. राज यांनी बाळासाहेबांचं एक शिल्प बनवून घेत आहे आणि ते आपल्या निवास्थानी ठेवणार आहे. या शिल्पाची जबाबदारी मुंबईतल्या सोनावणे बंधुंकडे सोपवण्यात आलीय. या शिल्पावर सध्या काम सुरु आहे. यावर सूचना घ्यायला हे शिल्पकार आज राज यांच्या निवास्थानी आले होते. त्यावेळी राज यांनी या शिल्पाची पाहणी केली आणि काही सुचनाही केल्यात.

सोनावणे बंधुंनी बाळासाहेबांच्या फोटोच्या आधारे एक शिल्प तयार केलं होतं पण मला ते इतकं आवडलं नाही. त्यामुळे त्यांनी आणखी एक नवीन शिल्प तयार केलं. मला बाळासाहेबांच्या नेहमीच्या पुतळ्यांसारखं ते नको हवं होतं. थोड वेगळं आणि एक चांगलं जरा स्टाईलिश शिल्प हवं होतं. बाळासाहेबांवर आपलं प्रेम आहेच म्हणून शिल्प साकरलं जातं आहे. त्यामागे असा कोणताही राजकीय हेतू नाही. त्याकडे फक्त एका कलाकृती म्हणून पाहावं असंही राज यांनी स्पष्ट केलं.

close