ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचं निधन

December 7, 2013 8:27 PM1 commentViews: 6031

vinay apte07 डिसेंबर : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचं मुंबईत निधन झालं. दिर्घ आजारानं त्यांचं कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि हिंदी चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजवल्यात.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या दर्जेदार नाटकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं. अलीकडेच ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतील त्यांची भूमिका ही खूप गाजली. खर्जातला आणि धारदार आवाज हा त्यांच्या अभिनयाला आणखी बहार आणायचा.

जोगवा, ‘तार्‍यांचे बेट’, ‘लालबाग परळ’,’चेकमेट’, ‘साथिया’, ‘आरक्षण’, ‘चांदनी बार’, ‘एक चालीस की लास्ट लोकल’, ‘राजनिती’ या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. नुकतीच झालेली नाट्य परिषदेची निवडणूक खूप गाजली.

विनय आपटेंनी मोहन जोशींच्या विरोधात ही निवडणूक लढवली होती. विनय आपटे यांच्या निधनामुळे एक तारा निखळला अशी भावना व्यक्त होत आहे.

=====================================================

विनय आपटेंचा अभिनय प्रवास

=====================================================

नाटक

 • कबड्डी कबड्डी
 • डॅडी आय लव्ह यू
 • कुसुम मनोहर लेले

=====================================================

चित्रपट

 • जोगवा
 • तार्‍यांचे बेट
 • चेकमेट
 • एक चालीस की लास्ट लोकल (हिंदी)
 • चांदनी बार (हिंदी)
 • राजनिती (हिंदी)
 • आक्रोश (हिंदी)
 • साथिया (हिंदी)

 

 • PRAMOD KADAM

  SO SAD

close