अहमदनगरमध्ये सरकारी कार्यक्रमासाठी झाडं तोडली

February 15, 2009 11:31 AM0 commentsViews: 1

15 फेब्रुवारी अहमदनगरअहमदनगर तालुक्यातील बारादारी इथे शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमासाठी वनमंत्री बबनराव पाचपुते यांची विशेष उपस्थिती होती. या सरकारी कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या सोयीसाठी तिथल्या शेकडो झाडांची कत्तल केली गेली. ही धक्कादायक माहिती जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब हराळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.अहमदनगर तालुक्यातील निसर्गरम्य चांदबीबी महालच्या परिसरात सरकरी कार्यक्रमाच्या संयोजकाने वाहनतळ आणि मंडप उभारणीसाठी शेकडो झाडं तोडली. झाडांच्या या हानीविषयी एकही शब्द न काढता, कार्यक्रमातून लोकसभेच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले. वन खात्याचे मंत्री येणार म्हणून वृक्षलागवड करण्याचे नाटकही यावेळी अधिका-यांनी केले. या गंभीर प्रकारणाची वनखात्याकडे चौकशी केली असता त्यांनी कॅमे-यासमोर गप्प राहणेच पसंत केलं. संबधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

close