दिल्लीत भाजप सत्तेच्या समीप, ‘आप’ची मुसंडी

December 8, 2013 11:35 AM0 commentsViews: 2310

delhi election08 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आतापर्यंतचे निकाल हाती आले असून निकालानुसार काँग्रेसचा पराभव निश्चित मानला जात आहे. भाजपने जोरदार मुसंडी घेत 33 जागांवर आघाडीवर आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने आपला करिश्मा दाखवून दिला आहे. आम आदमीने 27 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी काँग्रेसला दुहेरी आकडा ही गाठता आला नाही. काँग्रेस तिसर्‍या स्थानावर फेकली गेली असून काँग्रेसच्या फक्त 7 जागांवर टिकून आहे.

दिल्लीत एकूण 70 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. बहुमतासाठी 36 चा आकडा गाठवा लागणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. पराभवाची जबाबदारी स्विकारुन शीला दीक्षित यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.

निवडणुकीत शीला दीक्षित 4 हजार 909 मतांनी पिछाडीवर आहे आपला पराभव दिसत असताना दीक्षित यांनी राजीनामा दिलाय. त्यांच्याविरोधात उभे असलेले आम आदमीचे नेते अरविंद केजरीवाल 10 हजार 438 मतांनी आघाडीवर आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता जल्लोषाला सुरूवात केली असून ठिकठिकाणी फटाके फोडून कार्यकर्ते आनंद साजरा करत आहे. तर आम आदमीचे कार्यकर्तेही जल्लोषासाठी रस्त्यावर उतरले आहे.

(सविस्तर बातमी लवकरच)
 

close