काँग्रेसने उघडलंय दारूबंदी संस्कार केंद्र

February 15, 2009 3:36 PM0 commentsViews: 4

15 फेब्रुवारीकाँग्रेस पक्षानं मुंबईत आता दारुबंदी संस्कार केंद्र उघडलंय. तेही दादर सारख्या मध्यवर्ती भागात. लोकंच्या भल्यासाठी सुरू केलेल्या या कामाचा काँग्रेस कार्यकर्त्यांना काही फायदा होईल का ? सावित्रीबाई फुले महिला विकास मंडळामार्फत हे केंद्र चालवले जाणार आहे. पण या केंद्रामार्फत, काँग्रेसमधील दारू पिणा-या कार्यकर्त्यावर संस्कार कोण करणार असं विचारल्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग म्हणतात, एक तर मी दारू पित नाही. दुसरे जे पितात त्यांना तुम्ही हे सारे समजवणार आहे. काँग्रेसनं दारुबंदी केंद्र सुरू केलं. पण स्थानिकांना मात्र ते पटत नाही. स्थानिक नागरिक सांगतात, अशी केंद्र अनुभवी संस्थांना चालवण्यासाठी दिली पाहिजेत.फक्त जागेसाठी हे केंद्र स्थापन केल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.आता यापुढे आपण एवढंच करायचं. दारू पिताना कुणी काँग्रेस कार्यकर्ता वा नेता दिसला की कृपाशंकर सिंग किंवा एकनाथ गायकवाड यांना फोन करायचा. दारूबंदी प्रसाराला आपणच मदत करायला नको का ?

close