वारक-यांनी केली आनंद यादव यांच्या राजीनाम्याची मागणी

February 15, 2009 7:45 AM0 commentsViews: 115

15 फेब्रुवारी औरंगाबादसाहित्य संमेलनांचे अध्यक्ष आनंद यांनी संतसूर्य तुकाराम ही वादग्रस्त कादंबरी मागे घेतली. तरीही वारकरी समाधानी नाहीत. आनंद यादव यांनी संमेलनांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा संमेलन उधळून लावू असा इशारा वारकरी संघटनेनं दिला आहे. असा ठराव औरंगाबाद इथं वारकरी अधिवेशनात करण्यात आलाय. औरंगाबाद येथील वारक-यांच्या भक्ती-शक्ती संगम राज्यस्तरीय सोहळ्यात हा ठराव घेण्यात आला. वारक-यांनी एकूण सहा ठराव घेतले असून आनंद यादव यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा पहिलाच मंजूर करण्यात आला आहे. आनंद यादव यांनी वारक-यांच्या काळजाला जखमा केल्या असून त्यांनी आपली लोकसखा ज्ञानेश्वर ही कांदबरी सुध्दा परत घ्यावी. तसचं संमेलनाचं अध्यक्षपद स्वत:हून सोडावं अशी मागणी वारक-यांनी केली आहे.

close