अंतरिम बजेट सादर

February 16, 2009 4:42 AM0 commentsViews: 3

16 फेब्रुवारी दिल्लीप्रणव मुखर्जी आज अंतरिम बजेट सादर करणार आहेत. निवडणुकीपूर्वीचं हे शेवटचं बजेट असणार आहे. मतदार आणि उद्योजकांना खुश करणारं हे बजेट असेल.त्यामळे सगळेच जण या बजेटकडे डोळे लावून आहेत.आर्थिक मंदीच्या काळातलं हे बजेट आहे. सध्या सरकारला चिंता आहे ती मंदीमुळे वाढत चाललेल्या आर्थिक तुटीची. पुढच्या आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2009- 2010 सालात सरकारनं आर्थिक तुटीचं लक्ष्य पाच टक्क्यांवर आणलंय. म्हणूनच अर्थमंत्रालय, बजेटमध्येच आर्थिक मदत मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.1991 च्या बजेटनंतर हे पहिलंच बजेट असं आहे की ज्यात अर्थव्यवस्थेसमोर अनेक आव्हानं उभी ठाकली आहेत. यावेळी सर्वात मोठं संकट आहे ते जागतिक मंदीचं. या मंदीचे परिणाम पुढच्या आर्थिक वर्षातही म्हणजे 2009- 2010 सालातही दिसतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

close