बीडमधल्या नाट्यसंमेलनाचा समारोप

February 16, 2009 4:15 AM0 commentsViews: 4

16 फेब्रुवारी बीडगेले दोन दिवस बीडमध्ये सुरू असलेल्या 89 व्या नाट्यसंमेलनाचा समारोप मोठ्या जल्लोषात पार पडला.अनेक मान्यवरांनी तसेच स्थानिक कलाकारांनीही हजेरी लावली होती. यावेळी उर्जामंत्री सुनील तटकरे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, भाजप नेेते गोपीनाथ मुंडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. यात मुख्य आकर्षण होतं ते विविध कार्यक्रमांची रेलचेल असणा-या कलारजनीचं. लावणी, भारूड अशा वेगवेगळ्या लोककलांचं दर्शन यावेळी सगळ्यांना झालं. स्थानिक कलाकारांच्याही कलेला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. या संमेलनाची सांगताही हसतखेळत झाली. पुढील वर्षी नाट्यसंमेलन अमेरिकेतील न्यू जर्सी इथे होणार आहे.

close