मिझोरममध्ये सत्ता कुणाची ?

December 9, 2013 8:33 AM0 commentsViews: 1865

mizoram-mnf-and-mpc-reach-poll-agreement-for-assembly-elections_18101308293109 डिसेंबर : 25 नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या मिझोरम राज्याच्या 40 जागांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली.

मिझोरममध्ये सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वच म्हणजे 40 जागा लढवल्या आहेत तर भाजपने 17, एमएनएफ पक्षाने 31 जागा, मिझोरम पिपल्स कॉन्फरन्सने 8, मारालँड डेमॉक्रॅटिक फ्रंटने 1, झोरम नॅशनॅलिस्ट पक्षाने 38 जागा, आणि इतर पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 2, जय महाभारत पक्षाने 1 आणि 4 जागा अपक्षांनी लढवल्या आहेत. या निवडणुकीत 142 उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.

काल रविवारी दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस पिछाडीवर गेल्याने आता सर्वांच लक्ष मिझोरम निवणुकीच्या निकालाकडे लागले आहे. या निवडणूकीत एकूण सहा महिला उमेदवारांचा समावेश आहे. मतमोजणी शांततेत पार पडावी यासाठी आठ जिल्ह्यांमधल्या मतमोजणी केंद्रावर आवश्यक तेवढा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच. लालेंगमावीया यांनी काल स्पष्ट केले आहे.

close