पारा घसरला, राज्यात थंडीची लाट

December 9, 2013 5:03 PM0 commentsViews: 195

09 डिसेंबर : उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍याच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा तडाखा वाढला आहे. अनेक शहराचं तापमान सरासरीच्या खाली गेलं आहे. विदर्भ आणि उत्तर कर्नाटकातही थंडीची लाट निर्माण झालीय. त्यामुळे गेल्या दोन दिवसात तापमानात अनेक ठिकामी घट नोंदवण्यात आलीय. रविवारी राज्यात सर्वात कमी तापमान पुण्यात 7.8 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. ही थंडी येत्या चोवीस तासातही कायम राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

राज्यात थंडीची लाट (सर्व तापमान सेल्सिअस)

 • पुणे – 7.8
 • जळगाव – 11.3
 • महाबळेश्वर – 11
 • नाशिक – 9.7
 • सातारा 9.9
 • सोलापूर -11.4
 • मुंबई – 21.4
 • सांताक्रूझ -18.
 • उस्मानाबाद – 9
 • परभणी – 8.6
 • अमरावती 9.4
 • नागपूर – 9.3

 

close