अनधिकृत बांधकामांसाठी राष्ट्रवादीच्या 4 आमदारांचे राजीनामे

December 9, 2013 5:19 PM0 commentsViews: 1653

NCP MLA RESIGNE_pune09 डिसेंबर : पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातल्या अनधिकृत बांधकामांना मान्यता द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामास्त्र उपसले आहे.

विलास लांडे, अण्णा बनसोडे , बापू पठारे, लक्ष्मण जगताप या चार आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहे. या प्रकरणावर लवकर निर्णय होत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे.

दरम्यान, हा प्रकार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड परिसरात अनधिकृत बांधकामाच्या विरोधात पालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. या भूमिकेच्या विरोधात वारंवार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विरोध केला. मात्र आता अनधिकृत बांधकामासाठी चार आमदारांनी राजीनामे देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

(सविस्तर बातमी लवकरच)

close