‘त्या’ दोन संशयितांचा दाभोलकर खून प्रकरणाशी संबंध नाही !

December 9, 2013 8:00 PM0 commentsViews: 319

narendra dabholkar09 डिसेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचं गूढ अजूनही कायम आहे. या खून प्रकरणी गोवा आणि मुंबईतून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण, या संशयितांचा खुनाशी काही संबंध नाही अशी माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिली.

पण, या प्रकरणी नागोरी टोळीची चौकशी सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. डॉ. दाभोलकर यांचा खून करताना मारेकर्‍यांनी जे पिस्तुल वापरलं त्याच प्रकारचं पिस्तुल आढळल्यामुळे पुणे पोलीस नागोरी टोळीची चौकशी करत आहेत.

नागोरी टोळी बेकायदेशीरपणे शस्त्रास्रांची विक्री करते. आत्तापर्यंत या टोळीनं 47 बेकायदा शस्त्रास्त्र विकलीय. मनिष नागोरी हा टोळीचा म्होरक्या आहे. तो मूळचा इचलकरंजीचा आहे. पुणे विद्यापीठातल्या खून प्रकरणाशी या टोळीचा संबंध होता. या संशयावरुन शुक्रवारी गोव्यात दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आता पोलिसांची त्यांची चौकशी करुन सोडून दिलंय.

close