विदर्भात रास्ता रोको, फडणवीसांसह कार्यकर्ते ताब्यात आणि सुटका

December 9, 2013 8:16 PM0 commentsViews: 268

09 डिसेंबर : आघाडी सरकार शेतकरी विरोधी धोरण राबवत असल्याचा निषेध करत भाजपनं मराठवाडा आणि विदर्भात तब्बल सातशे ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं. विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आलं. नागपुरातल्या कॉटन मार्केट इथल्या आंदोलनादरम्यान फडणवीसांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रास्ता रोको केलं. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये हजर केलं त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनीे अकोला जिल्ह्यात 25 ठिकाणी रास्ता रोको केला. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अटक करून घेतली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही मोठ्या प्रमाणात भारनियमन होत असून कृषी पंपाची वीज कपात केली जातेय. तर अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पण या नुकसानभरपाईच्या सर्वेक्षणाला सहा महिने उलटून गेल्यावरही शेतकर्‍यांना मदत मिळाली नसल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलंय.

close