भारतीय ऑलिम्पिक महासंघावरची बंदी उठणार?

December 9, 2013 10:19 PM0 commentsViews: 103

ioa09 डिसेंबर : भारतीय ऑलिम्पिक महासंघ म्हणजे आयओए (IOA)वरील बंदी उठवण्याची शक्यता आहे. कारण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या म्हणजे आयओसी (IOC) च्या नियमांचं पालन करणार आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या किंवा दोषी अधिकार्‍यांना निवडणूक लढवता येणार नाही अशी घटनादुरुस्ती आयओएनं करावी असं आयओसीनं म्हटलं होतं. पण त्याला आयओएनं विरोध केला होता. त्यामुळे आयओसीनं आयओएवर बंदीची कारवाई केली. पण आता IOA नं आपल्या घटनेत दुरुस्ती केली आहे.

त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यात घातलेली बंदी आता उठण्याची शक्यता आहे. या नव्या नियमांनुसार IOA फेब्रुवारी महिन्यात निवडणूक घेणार आहे. त्यानुसार IOA चे अध्यक्ष अभयसिंग चौटाला आणि सेक्रेटरी जनरल ललित भानोत यांना निवडणुका लढवता येणार नाहीत. त्यामुळे आता भारतीय क्रीडा क्षेत्रात बदल घडेल आणि स्वच्छ कारभार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

close