मुंबईतील मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना फटकारलं

February 16, 2009 4:01 AM0 commentsViews: 2

16 फेब्रुवारी मुंबईविनोद तळेकरकुर्ल्याच्या नेहरू नगरमध्ये शिवसेनेनं विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने ही जागा जिंकली होती. या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी अनौपचारिकपणे मुंबईत लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडला.शिवसेनेच्या कमलाकर नाईक यांच्या पोट-निवडणुकीतल्या विजयाचा हा मेळावा जरी विजयाचा असला तरी कार्याअध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या भाषणातून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेचे प्रमुख मुद्दे काय असणार हे स्पष्ट झालं. हिंदुत्व आणि प्रांतीयवादा पाठोपाठ उद्धव ठाकरेंनी मालेगावचा मुद्दाही मांडला.मेळाव्याच्या भाषणात उध्दव ठाकरे म्हणाले, आम्ही हिंदुत्ववादी आहोतच पण जेव्हा मराठीचा मुद्दा आम्ही घेतो. तेव्हा आम्ही प्रांतीयवादी ठरतो. मग लालूंनी रेल्वे बजेटमध्ये दाखवला तो प्रांतीयवाद नाही का ? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. पुढे उद्धव यांनी देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही तोंडसुख घेतलं. एकूणच उद्धव ठाकरे यांच्या भाषणातल्या मुद्यांवरून, हे स्पष्ट दिसतंय की लोकसभा निवडणुकीत शिवसेना कोणत्या मुद्यांवर भर देईल.

close