‘आप’चा आमदार अडचणीत

December 10, 2013 11:34 AM0 commentsViews: 1744

vlcsnap-10 डिसेंबर : दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या दणदणीत विजयाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीचे सीमापुरीतले नवनिर्वाचित आमदार धर्मेंद्र कोहली यांच्यावर पराभूत झालेल्या माजी काँग्रेस आमदाराच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे.

विजयोत्सव साजरा करताना कोहली आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्या घरात घुसून गैरवर्तन केल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार वीर सिंग धिंगण यांच्या पत्नीने केला आहे.

close