‘आदर्श’ अहवाल याच अधिवेशनात !

December 10, 2013 1:55 PM0 commentsViews: 191

Image img_193912_adarsh_240x180.jpg10 डिसेंबर : राज्यात राजकीय भूकंप घडवणार्‍या आदर्श घोटळ्याबाबत अहवाल आज अधिवेशनात मांडला जाईल, अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली आहे. सोमवार पासून नागपूरमध्ये राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू  झाले आहे. न्यायमूर्ती जे.ए.पाटील आयोगाने अंतिम अहवाल सादर करून आता सहा महिने उलटून गेले आहेत त्यामुळे मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला हा अहवाल मांडण्यासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली होती त्यावर हे विधायक याच अधिवेशनात मांडणार असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले.

आदर्श घोटाळ्याने राज्याचं राजकारण फिरलं. अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद गेले आणि बड्या अधिकार्‍यांची अब्रू गेली. वादग्रस्त ‘आदर्श’ सोसायटीच्या न्यायालयीन चौकशीचा अंतिम अहवाल प्रसिद्ध करण्याबद्दल राज्य सरकार टाळाटाळ करतं असल्याची चर्चा होती.  हा अहवाल गुंडाळून वेळ मारून नेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न होता पण असं झालं तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा विरोधकांनी दिला होता.

अखेरीस भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी आदर्श घोटाळ्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने आदर्श घोटाळ्याचा अहवाल विधीमंडळात कधी मांडणार असा सवाल उपस्थित केला होता. आज राज्य सरकारतर्फे सरकारी वकिलांनी हायकोर्टात बाजू मांडली. आदर्श घोटाळ्याचा अहवाल याच अधिवेशनात मांडू असे आश्वासन सरकारने हायकोर्टाला दिले आहे.

close