विमानाचं इंधन स्वस्त झालं

February 16, 2009 9:05 AM0 commentsViews: 60

16 फेब्रुवारीविमान प्रवास स्वस्त व्हायला आता हरकत नाही. कारण एअर टर्बाइन फ्युएलमध्ये प्रति किलो लिटर 1 हजार 130 रुपयांची कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतलाय. ही दरकपात आता लागू होणार आहे. त्यामुळे आता बॉल विमान कंपन्यांच्या कोर्टात आहे. विमान कंपन्यांनी नुकतीच तिकीट दरात अचानक वाढ केली होती. त्यावर नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. वेगवेगळ्या क्षेत्रातूनही या दरवाढीवर तीव्र टीका झाली. डीजीसीएनंही विमान कंपन्यांना याबद्दल फटकारलं. आता तेल कंपन्यांनी विमानाच्या तेलाचे दर 3.7 टक्क्यांनी कमी केले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांनाही प्रवास भाडं कमी करावं लागणार आहे.

close