दिल्लीत सत्ता स्थापनेचा तिढा कायम

December 10, 2013 4:08 PM2 commentsViews: 1128

delhi kejriwal and harshvardhan10 डिसेंबर : दिल्लीत सरकार कोण स्थापन करणार याबद्दलचा तिढा अजूनही सुटला नाही. एकीकडे आम आदमी पार्टीची समिती पर्यायांचा विचार करण्यासाठी बैठक घेत आहेत. दिल्लीकरांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागू नये यासाठी कोणकोणते पर्याय असू शकतात यावर या बैठकीत चर्चा झाली. तर दुसरीकडे भाजपला काही मुद्यांवर पाठिंबा देण्याची सूचना आम आदमी पार्टीनं फेटाळून लावली आहे.

दुसरीकडे आम आदमी पार्टीच्या खेळीमुळे दिल्लीत सरकार स्थापन करणं भाजपलाही कठीण होऊन बसलंय. आपल्याकडे सत्ता  स्थापनेसाठी पुरेशा जागा नाही आणि आपण उमेदवारांची जमावाजमव करण्यासाठी घोडेबाजारही करणार नाही, असं भाजपने स्पष्ट केलं.

तर आपण विरोधी पक्षात बसणं पसंत करू आणि पुन्हा निवडणुकांसाठीसुद्धा तयार आहोत, असं योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीत जेडीयूचा एक उमेदवार निवडून आलाय. त्यांनी आम आदमी पार्टीला पाठिंबा देऊ केलाय. पण, केवळ एका आमदाराच्या पाठिंब्यानं आम आदमी पार्टी सरकार स्थापन करू शकणार नाहीय.

या पार्श्वभूमीवर आता दिल्लीमध्ये लोकपालचा विषयही तापताना दिसतोय. अण्णांनी राळेगणमध्ये आज आंदोलनाला सुरुवात केली आहे. तर आपण नेहमीच जनलोकपाल विधेयक आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं भाजपनं म्हटलं आहे. हा मुद्दा जरी आम आदमी पार्टीच्या जाहीरनाम्याावर असला तरी भाजप नेहमीच भ्रष्टाचाराच्या विरोधात राहिलंय, असंही भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलंय.

  • Sham Dhumal

    दिल्लीत भाजप आणि ए ए पी ने सरकार बनविणे उचित होईल. परंतु असे न केल्यास
    लगेच निवडणुका घेतल्यास भाजप च्या जागा वाढतील आणि ए ए पी च्या कमी होण्याचा धोका आहे. तसेच ए ए पी वरचा लोकांचा विश्वास कमी होईल.
    कॉंन्ग्रेसच्या जागा मात्र नक्कीच कमी किंवा झिरोसुध्दा होतील.

  • kailas harkal

    delhi madhe punha nivadnuka ghetlya tar AAP chy jaga nakkich vadhtil aani spasta bahumat milel…Anna Hajare yanni punha suru kelelya aandolanacha fayada AAP la nakkich hoil…

close