राष्ट्रवादीचे दबावतंत्र, 53 नगरसेवकांचे राजीनामे

December 10, 2013 3:25 PM2 commentsViews: 1597

ncp pune news3410 डिसेंबर : पुणे आणि पिंपरी – चिंचवड परिसरातल्या अनधिकृत बांधकामांना मान्यता द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादीचे नेते सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आमदारांच्यापाठोपाठ आता नगरसेवकांनी राजीनामास्त्र उपसले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादीच्या 53 नगरसेवकांनी राजीनामा दिले आहे.

आज पुणे महापालिकेतल्या राष्ट्रवादीच्या 13 नगरसेवकांनी राजीनामे दिलेत. सोमवारी सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार विलास लांडे , अण्णा बनसोडे , बापू पठारे, लक्ष्मण जगताप या चार आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्षांना दिले.

आमदारांनी राजीनामे देऊन काही तास होत नाही तेच पिंपरी चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या 40 नगरसेवकांनीही राजीनामे दिलेत. अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणावर लवकर निर्णय होत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे. दरम्यान, हा मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा हा प्रकार असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, चिंचवडच्या अनधिकृत घरांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेच शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पुढच्या आठवड्यात या संदर्भातल विधेयक आणणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं अशी माहिती शिवसेना आमदार निलम गोर्‍हेंनी दिली.

  • Ranjeet Patil

    Rajyatil itar building che Kaay karanar mag. Prathamtaha ya madhe konkonate builder aani rajkarani aadakalet te sarwana sanga.

  • haji ali

    ya murkhanna koni niyam samjaun sanga ani tyanchi karnehi.. ani jar niyam palale nahit tar honare dushparinam.. nustya faltu votes sathi he bindok lok natak kartayet. Akla gana thevlyat ka yanni? doka bhanavar ahe ka yancha? udya aag lagli kinva kuthali naisargik aapatti aali tar yancha ba denar ahe ka nuksan bharpai anadhikrut bandhkam kelelyanna? ani madat pochavnar kashi asha barik gallyant?
    ani hotil mag ajun 4-5 lakh anadhikrut bandhkame.. basa bomlat mag ani dya parat rajiname.. yanchi layki nastanna nivdun aalet tar asach vartan apekshit ahe mag te kontyahi kalpatle aso

close