‘विक्रांत’ला 100 कोटी देण्यास मनसेचा विरोध

December 10, 2013 7:42 PM2 commentsViews: 2471

ins vikrant vs mns news10 डिसेंबर : आयएनस विक्रांत या ऐतिहासिक युद्धनौकेला वाचवण्यासाठी महापालिकेनं पैसे देण्यावरून मनसेत मतभेद निर्माण झाले आहे. विक्रांतला महापालिकेनं 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली. मात्र 100 कोटी द्यायला मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी विरोध केलाय.

पैसे विक्रांतला देण्यापेक्षा विकासकामांवर खर्च करा, अशी भूमिका त्यांनी घेतलीय. विक्रांतच्या संवर्धनाचं काम राज्य सरकारनं करावं, आणि वस्तूसंग्रहालय उभारण्याचं काम महापालिकेनं करावं असं त्यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय.

तर कायद्यानुसार महापालिकेला पैसे देता येतात का, असा सवाल मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागिल आठवड्यात दादरला हेरिटेजचा दर्जा देण्यापेक्षा विक्रांतला वाचवा असं आवाहन केलं. त्यांचं आवाहन मोडीत काढत मनसेच्या नगरसेवकांनी वेगळाच सूर लावलाय.

  • Amar

    दर वर्षी २५ कोटी या प्रमाणे महापालिकेने गेली चार वर्षे अर्थसंकल्पामध्ये INS विक्रांतसाठी केलेली तरतूद होती, त्याची एकूण रक्कम १०० कोटी महापालिकेने द्यावी अशी मागणी शिवसेनेने केली होती. ती मागणी मान्य करून जर महापालिका १०० कोटी देत असेल तर चांगली गोष्ट आहे. मनसे ने विरोध करताना तो चार वर्षपूर्वी करायला हवा होता. १०० कोटी देऊन महापालिकेला संग्रहालयाच्या रूपाने एक उत्पन्नाचे साधनही उपलब्ध होतेय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. निवडणुका आल्या की लोकांचे प्रश्न दिसणारे आणि देश प्रेम जागृत होणारे अनेक पक्ष आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की INS विक्रांत साठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद असून तीचा लिलाव होणे आणि भंगारात निघणे ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मनसेसाठी नाशिककर सांगतील विकासकामांवर किती खर्च होतो ते.

  • सौरभ बेहेरे

    भंगारावर १०० कोटी टाकण्यापेक्षा नवीन तंत्रांज्ञानावर निधी खर्च करा. 100 कोटी मधून थोडा निधी “नवी मुंबईच्या आणि मुंबईच्या रस्त्यांवर खर्च करा आणि रस्ते कायमचे नीट करा”.

close