मंडेलांना निरोप

December 10, 2013 9:13 PM0 commentsViews: 377

10 डिसेंबर : नेल्सन मंडेला यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आजपासून जोहान्सबर्गमध्ये मेमोरियल सर्व्हिसेस सुरु आहे. जोहान्सबर्गच्या एफएनबी स्टेडियममध्ये ही मेमोरियल सर्व्हिस होतेय. यासाठी जगभरातले 91 देशांचे प्रमुख नेते जोहान्सबर्गमध्ये उपस्थित आहेत. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही मंडेलांना श्रद्धांजली वाहिली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज याही मंडेलांना आदरांजली वाहण्यासाठी जोहान्सबर्गमध्ये आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनही उपस्थित आहेत. 15 डिसेंबरला म्हणजे येत्या रविवारी कुनू या मूळ गावी मंडेलांवर अंत्यसंस्कार होणार आहेत.

close