अखेर दिवाकर रावतेंची दिलगिरी

December 10, 2013 11:27 PM0 commentsViews: 1036

divakar ravate10 डिसेंबर : जादूटोणाविरोधी विधयेकावरून डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि श्याम मानव यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केलीय.

आयबीएन-लोकमतच्या आजचा सवाल या कार्यक्रमात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि श्याम मानव हे सरकारचे दलाल आहेत, अशा शब्दांत रावते यांनी टीका केली होती.

त्यावरून मंगळवारी दिवसभर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. अखेर रात्री ‘आजचा सवाल’ या कार्यक्रमात बोलताना रावते यांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

काय म्हणाले होते रावते?

 ‘कोणतही विधेयक सरकार बनवत असते आणि विधी खात्याच्या मान्यतेनुसार कायदेशीर अडचणी येऊ नये हे पाहिलं जातं. मात्र महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच घडलंय. एखादा कायदा आणण्यासाठी सरकारला दलालाची मदत घ्यावी लागते. पहिले नंबर एकचे दलाल होते नरेंद्र दाभोलकर. दुर्देवाने ते गेले ती दुखद घटना आहे. मात्र त्यांच्या मृत्यूपश्चात श्याम मानव फडफडत उठले. राज्यभर तुम्हाला काय हवं अशी विचारणा करत आहे, श्याम मानव सरकारचे दलाल आहे का? अशी मुक्ताफळं रावते यांनी उधळली होती.

close