जादूटोणाविरोधी विधेयक आज विधिमंडळात मांडणार ?

December 11, 2013 9:33 AM0 commentsViews: 242

jadu tona11 डिसेंबर : जादुटोणाविरोधी विधेयकाच्या एखाद-दुसर्‍या मुद्यांवर आक्षेप घेत विरोधकांनी सरकारची कोंडी करायचा प्रयत्न केला आहे. विधेयक आपल्या मनाप्रमाणे झाले नाही, तर आपणही वेगळी भूमिका घेऊ, असं भाजपनी म्हटले आहे. पण सरकारनेही हे विधेयक आज बुधवारी विधिमंडळात मांडण्याचे निर्धार संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटल यांनी व्यक्त केला आहे.

 

विधेयकाचा अंतिम मसुदा या आठवड्यात तयार करून, विधेयकाच्या स्वरूपात मांडण्यात येणार असल्याने या विधेयकाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत हे विधेयक मंजूर करण्याचा निर्धार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्याने हे विधेयक या अधिवेशनातच मंजूर होईल, असा विश्‍वास संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
सरकारने काढलेल्या अध्यादेशातून धार्मिक विधी हा शब्द वगळण्यात येणार आहे; तर शरीराला इजा होईल, अशी कोणतीही क्रिया करण्यास मज्जाव करण्यात आलेल्या कलमाबाबत मतभेद कायम आहेत. हिंदू आणि मुस्लिम धर्मातल्या काही रीती आणि रिवाज यावर या कलमाचा गंभीर परिणाम होणार असल्याचा आक्षेप अनेक आमदारांनी आणि धर्म प्रतिनिधींनी घेतला. त्यामुळे सरकारनेही यामध्ये एकमत तयार करून बदल करण्याचा मार्ग मोकळा ठेवला आहे.

close