संतोष मानेची फाशीची शिक्षा कायम

December 11, 2013 1:17 PM0 commentsViews: 975

p1_1_b11 डिसेंबर : स्वारगेट बसस्थानकातून उलट्या दिशेने आणि बेदरकारपणे एसटी चालवून 9 जणांना चिरडणार्‍या संतोष मानेची फाशीची शिक्षा पुणे सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. संतोष मानेला कलम 302, 324, 427, कलम 3 (2) या कलमांतर्गत शिक्षा दिली आहे. आज बुधवारी फेरसुनावणीवेळी पुणे सत्र न्यायालयात संतोष मानेची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.

पुणे सत्र न्यायालयाने आरोपीची बाजू ऐकून घेतली नव्हती आणि ही गंभीर चूक आहे असे म्हणत मानेच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि हा खटला पुन्हा फेरसुनावणीसाठी दिला होता. त्यानुसार आज ही चौकशी पूर्ण झाली असून दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत.

मानेच्या वकिलांनी संतोष माने हा मनोरुग्ण असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यावर येरवडा मनोरुग्णालयातल्या चार सदस्यीय डॉक्टरांच्या समितीने माने मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट केले. 8 डिसेंबरला हा युक्तिवाद पूर्ण झाला असून पुणे सत्र न्यायालयाने आज बुधवारी फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणा असल्याचं मानेच्या वकिलांनी सांगितले आहे.

close