‘विक्रांत’साठी गणेश मंडळांनी उचलला खारीचा वाटा !

December 11, 2013 7:40 PM1 commentViews: 1042

ins vikrant11 डिसेंबर : 1971 च्या युद्धात ऐतिहासिक कामगिरी बजावणार्‍या आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी आता गणेशभक्त धावून आले आहे. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं यासाठी पुढाकार घेतलाय. ‘विक्रांत बचाव’साठी 10 कोटी रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त मदत देण्याचा खारीचा वाटा गणेश मंडळांनी उचलला आहे.

मुंबईत एकूण 40 गणेश मंडळ आहे. प्रत्येक मंडळानं 10 हजार रुपये दिले तर 10 कोटी 40 लाख रूपये जमा होतील. हे सर्व पैसे जमा करुन नौदलाकडे देणार असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष नरेश दहिबावकर यांनी दिली.

तसंच मोठ्या गणेश मंडळांनी जसे लालबागचा राजा, जीएसबी गणेश मंडळाने जर निधीसाठी मोठा हातभार लावला तर निधी आणखी मोठ्या प्रमाणावर जमा होईल असा विश्वासही दहिबावकर यांनी व्यक्त केली. या अगोदर मुंबई महापालिका आणि गणेश मंडळपुढे आले आहे. विक्रांत युद्धनौका देशाचीच नव्हे तर मुंबईची सुद्धा शान आहे आणि ही शान अबादाधीत राहावी यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतलाय.

विशेष म्हणजे विक्रांतची देखभाल करण्यासाठी वर्षाला 500 कोटींचा खर्च आहे. विक्रांतवर खर्च करण्याची जबाबदारी राज्य सरकारची होती मात्र सरकारने नकार दिल्यामुळे विक्रांतचा लिलाव होणार आहे. पण हा लिलाव वाचवण्यासाठी सर्व स्तरातून लोकपुढे येत आहे.

  • Dhaval R

    500 crores every year is no child’s play. One state should not bear this amount since it will have long term negative impact on its budget. The state has done the right thing in refusing the proposal. Ganpati mandals should also see sense and not waste their money on such ill projects.

close