अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मांडलं

December 11, 2013 7:50 PM0 commentsViews: 1020

Image img_167692_jadutoana_240x180.jpg11 डिसेंबर : अनेक वर्ष चालढकल केल्यावर अखेर राज्य सरकारनं जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत मांडलं. सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी जादूटोणा विरोधी विधेयक विधानसभेत चर्चेसाठी मांडलं.

पण या विधेयकाबाबत भाजप आणि शिवसेना सकारात्मक असली तरी त्यांचा या विधेयकाला छुपा विरोध असल्याचं त्यांनी केलेल्या विधानसभेतल्या भाषणांमधून दिसून आला. विरोधकांनी सूचवलेल्या सुधारणा स्वीकारून हे विधेयक मंजूर करण्यात यावं, नाहीतर हे विधेयक चिकित्सा समितीकडं पाठवावं.

पण रेटून हा कायदा पास करू नका अशी भूमिका भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी घेतलीय. तर या कायद्याचा ऍक्ट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे दुरूपयोग होईल अशी भिती व्यक्त करत शिवसेनेचे गटनेचे सुभाष देसाई यांनी हा कायदा विनाकारण केला जातोय अशी टीका केली. विधेयकावरची ही चर्चा रात्री उशिरा पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.

close