कुबेर बोट मालकाच्या स्वाधीन

February 16, 2009 2:18 PM0 commentsViews: 6

16 फेब्रुवारी मुंबई26/11 च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईत येण्यासाठी कुबेर बोटीचं अपहरण केलं होतं. 26/11नंतर ही बोट तपासासाठी मुंबई पोलिसांकडे होती. आता ही बोट मुंबई पोलिसांनी बोटीचा मालक विनोद मसानी याला परत केली आहे. समुद्रमार्गानं मुंबईत येण्यासाठी अजमल कसाब आणि त्याच्या 9 साथिदारांनी कुबेर बोटीचं गुजरातमधील पोरबंदर इथून अपहरण केलं होतं. बोटीवरचा तांडेल अमरसिंग याची हत्या केली आणि त्यानंतर 26/11 ला मुंबईवर हल्ला चढवला. 26/11 हल्ल्यांमध्ये या बोटीकडे महत्त्वाचा पुरावा म्हणून पाहिलं जातं. कारण या बोटीवरून पोलिसांनी 2 गे्रनेड्स, 5 मॅगझिन्स, सॅटेलाइट फोन, पाकिस्तानी बनावटीच्या टुथपेस्ट, मीठ आणि पेप्सीच्या बॉटल्स जप्त केल्या होत्या. या पुराव्यांचा मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानी असल्याचं सिद्ध करण्यासाठी मदत होणार आहे.

close