11.12.13 च्या मुहूर्तावर 50 जोडपी लग्नबेडीत

December 11, 2013 10:05 PM0 commentsViews: 1473

11 डिसेंबर : 11.12.13 या अनोख्या मुहूर्ताचं औचित्यसाधून लग्नासाठी इच्छुक तरुण-तरुणींनी आज लग्नाच्या बेडीत अडकले. ठाण्यात 50 जणांनी लग्न केलं. आज लग्नाचा मुहूर्त नसतानाही विशिष्ट तारीख असल्यानं हा दिवस निवडल्याचं नवविवाहितांनी सांगितलं. यासाठी आज ठाण्यातील विवाह नोंदणी ऑफिसबाहेर सकाळपासून गर्दी केली होती. विवाह नोंदणी कार्यालयाबाहेर वर्‍हाडी मंडळीसह नव जोडप्यांनी गर्दी केली होती. विशेष म्हणजे 11.12.13 चा मुहूर्त साधण्यासाठी 25 जणांनी एका महिन्यापूर्वीचं नोंदणी केल्याचं नोंदणी अधिकार्‍यांनी सांगितलं.

close