‘लोकपाल’ उद्या संसदेत मांडणार ?

December 12, 2013 3:26 PM0 commentsViews: 461

Image img_220012_loksabha3456234_240x180.jpg12 डिसेंबर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युपीए सरकारने पेंडिग काम हाती घेतली आहे. बहुचर्चित लोकपाल विधेयक उद्या शुक्रवारी संसदेत मांडण्याची शक्यता आहे.

2012 मध्ये हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत हे विधेयक रखडलं होतं. अखेर लोकपाल विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे पण समाजवादी पक्ष या विधेयकाला विरोध करणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिलाय. तर दुसरीकडे हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावं यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरू केलंय.

लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी जन आंदोलन उभारले होते. अखेर या आंदोलनचा दखल घेऊन मागिल वर्षी हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मांडण्यात आलं होतं. पण काही त्रुटीमुळे विधेयक रखडलं गेलं होतं. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अण्णांनी उपोषणास्त्र उपसले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी लोकपाल याच अधिवेशनात मांडलं जाणार असल्याचं जाहीर केलं होतं.  आता संसदेत यावेळी हे विधेयक मंजूर होतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

close