केजरीवाल आजारी, अण्णांची भेट रद्द

December 12, 2013 4:19 PM0 commentsViews: 576

 anna and kejriwal12 डिसेंबर : जनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. अण्णांच्या उपोषणाला आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दिला असला तरी आजची भेट टाळली आहे.

तब्येत ठीक नसल्याचं कारण देत केजरीवाल यांनी राळेगणचा दौरा रद्द केलाय. बुधवारी संध्याकाळी दिल्लीत ‘आप’च्या रॅलीत केजरीवाल यांनी अण्णांना पाठिंबा जाहीर केला होता आणि आज गुरूवारी सकाळी अण्णांची भेट घेणार असल्यांचंही स्पष्ट केलं होतं. मात्र केजरीवाल यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे अण्णांची भेट टाळली आहे.

पण आम आदमी पार्टीचे सदस्य कुमार विश्वास यांनी अण्णांची भेट घेतली. कुमार विश्वास यांच्याबरोबर संजय सिंग आणि गोपाल राय हे सुद्धा होते. दरम्यान, लोकपाल विधेयक येईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार अण्णा हजारेंनी केला आहे. आज सकाळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज अण्णांची भेट घेतली.

close