बहुमताचा तिढा सुटेना, दिल्लीत पुन्हा निवडणुका?

December 12, 2013 4:41 PM0 commentsViews: 1382

delhi kejriwal and harshvardhan12 डिसेंबर : दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करण्याचा तिढा अजूनही कायम आहे.  लेफ्टनंट गर्व्हनर नजीब जंग यांनी सगळ्यात जास्त जागा जिंकणारा पक्ष भाजपला दिल्ली विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रित केलं असून भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार्‍या हर्ष वर्धन यांना सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करावेत असंही म्हटलं आहे. मात्र बहुमतासाठी संख्याबळ नसल्यामुळे भाजप आणि आम आदमी पार्टी या दोन्ही पक्षांनी पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केलीये.

दिल्लीत 70 जागांसाठी घेण्यात आलेल्या विधासभेच्या निवडणुकीत भाजपने 32 जागा पटकावल्या आहे तर आम आदमीने 28 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 8 तर इतर अपक्ष पक्षाने 2 जागा मिळवल्या आहे. पण बहुमतासाठी 36 जागांचं संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे.

त्यामुळे बहुमत घ्यायचे तर कुणाकडून असा पेच भाजपपुढे निर्माण झालाय. अपक्षांचा पाठिंबा घेतला तरी 34 जागा होता. आणखी 2 जागा लागणार आहे. आम आदमी अगोदरच भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे भाजपपुढे सरकार स्थापन करावे तरी कसे असा प्रश्न उभा राहिलाय.

खुद्द हर्ष वर्धन यांनी आमच्याकडे बहुमतच नाही असं स्पष्ट केलं होतं. आता लेफ्टनंट गर्व्हनर यांनी आमंत्रण दिल्यामुळे भाजप काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.पण आपल्याकडे सरकार स्थापण्यासाठी पुरेशा जागा नसल्याच्या भूमिकेवर भाजप ठाम राहण्याची शक्यता आहे. आता ही राजकीय अनिश्चितता संपण्याची शक्यता निर्माण झालीये.

close