चोरट्या बहिणींची गँग गजाआड

December 12, 2013 6:36 PM0 commentsViews: 1320

12 डिसेंबर : तीन सख्या बहिणी एकत्र येतात आणि आपलीच एक गँग बनवतात आणि या गँगच्या माध्यमातून चोरी, लुटमार करतात अगदी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी घटना मुंबईजवळील मीरा रोड भागात घडलीय. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे या गँगला गजाआड केलंय.

गौरी श्रीकांत, मोना देवी गुंडा आणि जोगेश्वरी देवी गुंडा असं या बहिणींचं नाव आहे. अगदी साध्याभोळ्या दिसणार्‍या ह्या तिन्ही बहिणी मोठ्या चलाख चोर आहे. भाईंदरच्या बीपीरोड परिसरातील बॅक ऑफ इंडिया शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेरात चोरी करताना कैद झाल्यात. बँकेत प्रवेश केल्यानंतर मोना आणि जोगेश्वरी इकडे-तिकडे बघत आपले सावज शोधायच्या, कोण जास्त रक्कम काढतंय याकडे नजर ठेवून होत्या. आणि एवढ्यातच सीता चौरसिया नामक महिलेवर त्यांची नजर पडली. सीता यांनी बँकेत 50 हजार रुपये काढून कापडी पिशवीत ठेवत होती. सीता या पासबुकमध्ये इंट्रीसाठी काउंटर लाईनमध्ये उभ्या असताना दोघी बहिणी त्यांच्या पाठीमागे येऊन उभ्या राहिल्या आणि वारंवार आपला दुपट्टा खाली पडण्याच नाटक करत ब्लेडने पिशवी फाडून 50 हजार रुपये घेवून पसारही होतात. मात्र सीता यांना याचा अजिबात पत्ता लागला नाही. काही वेळानंतर सीता चौरसिया यांच्या लक्षात आले की, आपले 50 हजार रुपये चोरी गेले आहे. त्यानंतर त्यांनी सीसीटीव्हीच्या आधारे नवघर पोलिसात तक्रार दाखल केली. पण त्यानंतर या गँगने मिरारोडच्या बॅक ऑफ इंडियाच्या शाखेत या तिन्ही बहिणींना नशिबाने साथ दिली नाही आणि तिघींनाही खातेदार स्वाती सिंगच्या सतर्कतेमुळे अटक झाली. मोठ्या बहिणीचे नाव गौरी श्रीकांत, मधलीचे नाव मोना देवी गुंडा आणि छोटीचे जोगेश्वरी देवी गुंडा आहे. या तिघीही मुळच्या मध्यप्रदेशच्या असल्याच पोलिसांनी सांगितलं. मीरारोड पोलिसात या गँगच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहे.

close