‘कोब्रा’ दंश, लाचखोर खासदार कॅमेर्‍यात कैद

December 12, 2013 8:35 PM0 commentsViews: 1122

cobra post12 डिसेंबर : कोब्रापोस्ट या वेबसाईटनं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये पुन्हा एकदा संसदीय राजकारणाचा भ्रष्ट चेहरा लोकांसमोर आणलाय. ऑपरेशन ‘फाल्कन क्लॉ’या नावानं केलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये काँग्रेस,भाजप, बसप, जेडीयू आणि अण्णा द्रमुक या पक्षांच्या मिळून अकरा खासदारांचा भ्रष्टाचार उघड झालाय.

मेडिटेरानिअन ऑइल कंपनी या काल्पनिक ऑस्ट्रेलियन कंपनीचा प्रसार करण्यासाठी, शिफारसपत्र देण्यासाठी या अकरा खासदारांनी 50 हजार ते 50 लाख रुपयांपर्यंत फी मागितली. एवढंच नाही, तर सहा खासदारांनी पैसे घेऊन शिफारसपत्र दिलंही. सर्व खासदारांनी फी म्हणून रोख रक्कम मागितली, एका खासदारानं तर हवाला मार्गाने पैसे द्यायला सांगितलं.

विशेष म्हणजे एकाही खासदारानं कंपनीची सत्यता पडताळून पाहण्याची तसदी सुद्धा घेतली नाही. कोब्रापोस्टच्या प्रतिनिधीने मेडिटेरानिअन ऑइल कंपनीचे सल्लागार असल्याचं भासवलं. कंपनीची वेबसाईट, ब्रोशर, माहितीपत्रक ही सर्व तयारी करून हा प्रतिनिधी या खासदारांना भेटला. या कंपनीला ईशान्य भारतामध्ये तेल शोधण्यासाठी 1 हजार 000 कोटी रुपयांचा प्रकल्प उभारायचा आहे. त्यासाठी त्यांना पेट्रोलियम मंत्रालयाकडे लॉबिंग करायचं आहे, असं त्यांनी या खासदारांना सांगितलं.

त्याला सर्व खासदारांनी सहमती दर्शवली. हा प्रकल्प उभारताना तिथल्या नागरिकांच्या हक्कांचं उल्लंघन होणार होतं, त्याचीही पर्वा या खासदारांनी केली नाही. 50 हजार ते 50 लाख इतक्या मोबदल्यात या खासदारांनी पेट्रोलियम खात्याच्या सचिवांना किंवा थेट मंत्र्यांना शिफारसपत्र लिहिण्याची तयारी दर्शवली.

 

कोण कोण खासदार होते ?

1) लालू भाई पटेल, खासदार, भाजप
50 हजार रु. मागितले
2) रवींद्र पांडे, खासदार, भाजप
2 लाख रु. मागितले
3) हरी मांझी, खासदार, भाजप
1.50 लाख रु. मागितले
4) के. एल. बैरवा, खासदार, काँग्रेस
50 लाख रु. मागितले
5) विक्रम भाई अरजन भाई मादम, खासदार, काँग्रेस
5 ते 10 लाख रु. मागितले
6) के. सुगुमार, खासदार, अण्णाद्रमुक
स्वत: पैसे मागितले

7) सी. राजेंद्रन, खासदार, अण्णाद्रमुक
50 हजार रु. मागितले

8) कैसर जहाँ, खासदार, बहुजन समाज पक्ष
चिठ्ठीसाठी 1 लाख रु. मागितले
मंत्र्याशी बोलण्यासाठी 5 लाख रु. मागितले

9) बी. चौधरी, खासदार, जेडीयू
50 हजार रु. मागितले

10) माहेश्वर हजारी, खासदार जेडीयू
प्रत्येक खासदारासाठी 5 लाख रु.

11) विश्वास मोहन कुमार, खासदार, जेडीयू

 


close