कांद्याने केला आता शेतकर्‍यांचा वांदा

December 12, 2013 9:40 PM0 commentsViews: 627

Image img_140472_onion_240x180.jpg12 डिसेंबर : कांद्याने आता शेतकर्‍यांचा वांदा केलाय. नाशिकच्या होलसेल मार्केटमध्येकांद्याचे भाव कमालीचे कोसळत आहेत. त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडून आंदोलनं केली. लालसगाव बाजार समितीच्या सभापतींनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना पत्र लिहून गेल्या महिन्यात वाढवलेली निर्यात मूल्य कमी करण्याची विनंती केली आहे.

नाशिकच्या मार्केटमध्ये लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झालीए. दुसरीकडे गेल्या महिनाभरापूर्वी वाढवलेल्या किमान निर्यात मुल्यामुळे कांद्याची निर्यात पूर्णपणे ठप्प आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात तब्बल सव्वा लाख कांदा पडून आहे. गेल्या आठवडाभरात कांद्याचे भाव 500 रुपये क्विंटलने गडगडले आहे.

त्यामुळे संतापलेल्या शेतकर्‍यांनी लिलाव बंद पाडले. मनमाडमध्ये रास्ता रोको करण्यात आला. बाजार समितीच्या मध्यस्थीने लिलाव सुरू करण्यात आले आहेत. आज सरासरी पंधराशे रुपये किंवटल या दरानं कांद्याची घाऊक खरेदी झाली. मात्र येत्या दोन दिवसात निर्यात मूल्य कमी केलं नाही, तर सोमवारपासून कांद्याचं मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिलाय.

close