औरंगाबादमध्ये केमिकल कंपनीत अग्नितांडव

December 12, 2013 9:48 PM0 commentsViews: 449

12 डिसेंबर : औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसीमध्ये बेंकी इंटरनॅशनल या केमिकल कंपनीला भीषण आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या आगीने प्रचंड रौद्ररुपधारण केलं होतं. या आगीत कंपनी जळून खाक झालीय. घटनास्थळापासून काही किलोमीटरपर्यंत आगीचा धुराळं दिसून येत होते. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तब्बल पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग विझवण्यात त्यांना यश आलंय. मात्र ही आग कशामुळे लागली हे अजूनही कळू शकले नाही.

close