दिल्लीत सरकार स्थापन करणार नाही -हर्ष वर्धन

December 12, 2013 10:34 PM0 commentsViews: 847

harsh vardhan _bjp _new12 डिसेंबर : दिल्लीत सरकार स्थापनेची कोंडी अजूनही सुटलेली नाहीय. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी आज भाजपच्या विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. पण बहुमत नसल्यानं भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही, असं हर्ष वर्धन यांनी जाहीर केलं.

आमच्याकडे बहुमतासाठी 4 जागा नाही, त्यामुळे आम्ही विरोधी बाकावर बसून जनतेसाठी काम करू असंही हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे सत्ता स्थापनेच्या शर्यतीतून माघार घेतल्यामुळे ‘आप’ला संधी देण्यात आली जर आपने नकार दिला तर पुन्हा निवडणुका किंवा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीत 70 जागांसाठी घेण्यात आलेल्या विधासभेच्या निवडणुकीत भाजपने 32 जागा पटकावल्या आहे तर आम आदमीने 28 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 8 तर इतर अपक्ष पक्षाने 2 जागा मिळवल्या आहे. पण बहुमतासाठी 36 जागांचं संख्याबळ सिद्ध करावे करण्याची भाजप आणि ‘आप’ने असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे बहुमत घ्यायचे तर कुणाकडून असा पेच भाजपपुढे होता. अपक्षांचा पाठिंबा घेतला तरी 34 जागा होता. आणखी 2 जागा लागणार आहे. आम आदमी अगोदरच भाजपला पाठिंबा देणार नसल्याचं जाहीर केलं.

त्यामुळे भाजपपुढे सरकार स्थापन करावे तरी कसे असा प्रश्न उभा होता अखेरीस सरकार स्थापनेच्या शर्यतीतून भाजपने माघारी घेतलीय. भाजप नेते हर्ष वर्धन यांनी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेतली आणि बहुमत सिद्ध करण्यात असहमत असल्याचं सांगितलं. दिल्लीच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव कटीबद्ध आहोत.सरकार स्थापन करु शकलो नाही तरी विरोधी बाकावर बसून दिल्लीकरांची सेवा करु असं वर्धन यांनी स्पष्ट केलं.

पुन्हा निवडणुका झाल्यातर त्यासाठीही आम्ही तयार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर नायब राज्यपालांनी आम आदमी पार्टीलाही चर्चेचं निमंत्रण दिलं. पण बहुमत नसल्यानं आपणही सरकार बनवण्याच्या स्पर्धेत नसल्याचं ‘आप’नं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे दिल्लीत आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याचाच पर्याय उपलब्ध असल्याचं मत राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहे.

close