मनसेचं लालूप्रसादांच्या विरोधात बॅनर कॅम्पेन

February 17, 2009 5:18 AM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी मुंबईनुकत्याच सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबई तसंच महाराष्ट्रासाठी रेल्वे मंत्र्यांनी कोणतीही भरीव तरतूद केली नाही. याच मुद्यांवर आता मनसेने लालूप्रसाद यादव यांच्या विरोधात एक बॅनर कॅम्पेन सुरू केलं आहे. मुंबई शहर तसंच उपनगरातल्या सगळ्या स्टेशन्सवर मनसेतर्फे अशाच आशयाचं एकेक होर्डिंग लावण्यात येतंय. या होर्डिंगवरच्या मथळयात लालूबरोबरच महाराष्ट्रातल्या खासदारांनाही खडे बोल सुनावण्यात आलेत. उत्तर भारतीय नेत्यांच्या या अरेरवी विरोधात उभे रहा, आता तरी डोळे उघडा असा सल्ला या बॅनरवर मनसेच्या वतीने महाराष्ट्राच्या खासदारांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर उत्तर भारतीय नेत्यांच्या विरोधात एक सह्यांची मोहीमही आता राबवण्यात आली आहे. येत्या काही दिवसात मनसेतर्फे जोडे मारा आंदोलनही करण्यात येणार आहे.

close