लोकपाल विधेयक आज संसदेत मांडणार?

December 13, 2013 8:50 AM0 commentsViews: 231

Image img_99922_sansad_240x180.jpg13 डिसेंबर : लोकपाल विधेयक आज संसदेत सादर करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. हे विधेयक आज राज्यसभेत मांडले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक संसदेत यूपीए सरकारमुळे मंजूर होत नसल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे. ज्या पद्धतीने काल पुरवणी मागण्या आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आल्या त्याच पद्धतीने लोकपाल विधेयकावरही चर्चा न करता ते मंजूर करावे, अशी मागणी भाजपने केली आहे.

दरम्यान, जनलोकपाल विधेयकासाठी अण्णांनी सुरू केलेल्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. काल अण्णांनी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधींना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली. इतका महत्त्वाचा मुद्दा असूनही सरकारने हे विधेयक अजून संसदेत मांडलेले नाही, असा आरोप अण्णांनी केला आहे. अण्णांनी भाजपचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्याही पत्राचे उत्तर पाठवले.

 

जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी भाजप प्रयत्न करत नसल्याचे अण्णांनी या पत्रात म्हटले आहे तर आता मनसेनेही अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर आज शुक्रवारी राळेगणसिद्धीत अण्णांची भेट घेणार आहेत. अण्णांविषयी महाराष्ट्रातल्या लोकांना आदर असून त्यांची लढाई प्रामाणिक माणसाची भ्रष्टाचार विरोधातली आहे आणि आपण जनलोकपाल बिलाचा आदर करावा, असे नांदगावकर म्हणाले.

close