दिल्ली दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर, एका संशयिताला अटक

December 13, 2013 9:15 AM0 commentsViews: 254

terrorist13 डिसेंबर : दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेचे जाळे पसरवून या ठिकाणी हल्ला करण्याचा कट आज शुक्रवारी सकाळी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उधळून टाकला आहे. दिल्ली पोलिसांनी मेवातमधूृन मोहम्मद शाहीद या इमामाला अटक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शाहीद दोनदा पाकिस्तानला जाऊन आला आहे आणि त्याच्याकडे एक डायरी सापडली असून दिल्लीत हल्ला घडवण्याचा कट रचण्याचे पुरावे त्यात सापडले आहेत. मात्र शाहीदचा सहकारी पळून जाण्यात यशस्वी ठरला असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

कमांडर जावेद बलुची हा ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेला मार्गदर्शन करत असल्याचे समोर येत आहे. पोलिसांनी बलुची आणि शाहीद यांच्यातील बातचीत टॅप केल्यातर ही कारवाई करण्यात आली.

close