देवयानी खोब्रागडेंना अटक आणि सुटका

December 13, 2013 10:15 AM0 commentsViews: 4050

devyani khobragade13 डिसेंबर : न्यूयॉर्कमधील भारताच्या दूतावासातील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा फसवणूक प्रकरणी न्यूयॉर्क येथे अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आपल्या घरातल्या आयासाठी व्हिसा मिळवताना कागदपत्रांची फेरफार केल्याचा आरोप आहे. काही वेळापूर्वी 25 हजार डॉलरच्या जामिनावर त्यांची सुटकाही करण्यात आली आहे.

देवयानीने आपल्या न्यूयॉर्कच्या निवासस्थानी घरकाम आणि मुलांचा सांभाळ करण्यासाठी एका भारतीय महिलेला कामावर ठेवले होते. त्या महिलेच्या व्हिसाची बोगस कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी व चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा देवयानी यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी देवयानी यांना अमेरिकन कोर्टाच्या नियमानूसार पाच ते दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

त्याच बरोबर देवयानीवर अमेरिकेतील नियमांचं उल्लंघन करत काम करणार्‍या महिलेला नियामापेक्षा कमी पगार देत असल्याचेही समजते.

close