राज्यसभेत ‘लोकपाल’वर सोमवारी चर्चा

December 13, 2013 2:05 PM0 commentsViews: 537

Image img_219392_sansadbhavan_240x180.jpg13 डिसेंबर : राज्यसभेत लोकपाल विधेयकावर आता सोमवारी चर्चा होणार आहे. दुपारी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री नारायण सामी यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे हे विधेयक मांडलं. चर्चेसाठी सहा तास राखून ठेवण्यात आले होते. हे विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करून घेण्याची भाजपनं तयारी दर्शवली होती.

मात्र, विधेयक मांडल्यानंतर समाजवादी पक्षानं महागाईचा मुद्दा उपस्थित करून गोंधळ घातला. संतापलेल्या राज्यसभेच्या उपसभापतींनी गोंधळ घालणार्‍या सदस्यांविरोधात कारवाईचा इशाराही दिला. अखेर सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं.

लोकपाल विधेयकासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष सत्यव्रत चतुर्वेदी आपल्या शिफारसींचा अहवाल मांडणार आहेत. तर सपाचा यातल्या अनेक शिफारसींना विरोध आहे. राज्यसभेनं बहुमतानं हा अहवाल स्वीकारला तर लोकसभेनं पाठवलेल्या विधेयकात राज्यसभेने केलेले बदल सभापती वाचून दाखवतील. आणि आवश्यक असेल तर त्यावर मतदान केलं जाईल.

close