शाहरूखवरची शस्त्रक्रिया यशस्वी

February 17, 2009 5:47 AM0 commentsViews: 1

17 फेब्रुवारी मुंबईबॉलिवुड किंग शाहरूख खान याच्या खांद्यावर मुंबईतल्या ब्रिच कँडी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शाहरूख खान लॉस एंजेलिसमध्ये माय नेम ईज खान या आगामी सिनेमाचं शूटिंग करत होता.त्या शूटिंगच्या दरम्यान शाहरूखच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी डॉक्टरांनी शाहरूखला सर्जरीचा सल्ला दिला होता. पण बिल्लूच्या प्रमोशनसाठी त्याने आपली शस्त्रक्रिया पुढे ढकलली. बिल्लू रिलिज झाल्यामुळे शाहरूखने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. शाहरूखला सोमवारी दुपारी ब्रिज कँडीमध्ये दाखल करण्यात आलं. सायंकाळी डॉ. संजय देसाई यांनी त्यांच्या खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. आता पुढील काही महिने शाहरूखला आराम करण्याची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र दुखापत ही आपल्यासाठी कामाची पावती असल्याचं शाहरुखने म्हटलंय.

close