शाहू महाराजांच्या पुतळ्याचं संसदेच्या प्रांगणात अनावरण

February 17, 2009 6:16 AM0 commentsViews: 2

17 फेब्रुवारी दिल्लीछत्रपती शाहू महाराजांच्या पुतळयाचं अनावरण राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला शरद पवार, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळही उपस्थित होते आहेत. संसद भवनाच्या गेट क्रमांक सहाजवळच्या लॉनवर, राजर्षींचा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा तयार केला आहे. या पुतळ्यासाठी पंधरा लाख रूपये खर्च करण्यात आले आहेत. ब्रॉंझ धातूपासून बनवण्यात आलेल्या या पुतळ्याची उंची बारा फूट आहे. संसदेच्या प्रांगणात शाहू महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर कोल्हापुरात उत्साहाचं वातावरण आहे.

close