अण्णांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा

December 13, 2013 5:20 PM1 commentViews: 1918

mns on raj13 डिसेंबर : अण्णा समर्थक आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु असलेल्या लढाईत मनसेनं अण्णा हजारे यांची बाजू घेतली आहे.आप आणि अण्णांच्या समर्थकाच्या लढाईत अण्णांची आहुती जाता कामा नये असं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

 

आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अण्णा हजारे यांना पाठिंबा जाहीर केलाय. मनसेचे गटनेते बाळा नांदगांवकर यांनी आज राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली आणि पक्षाचा पाठिंबा जाहीर केला. यावेळी खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोनवरुन अण्णांशी संवाद साधला आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं राज यांनी जाहीर केलं.

 

तसंच आप आणि अण्णांच्या समर्थकाच्या लढाईत अण्णांची आहुती जाता कामा नये असं परखड मतही राज यांनी व्यक्त केलं आणि अण्णांच्या आंदोलनला शुभेच्छाही दिल्यात. या अगोदरही अण्णांच्या आंदोलनाला मनसेनं अण्णांच्या पाठिंबा दिला होता.

  • आशिष नरेंद्र कापडे

    अन्नाचे जीवन हे समाजकार्यात गेले आहे त्यामुळे आण्णांना गरज आहे ती त्यांच्या आंदोलनाला पाठीबा करण्याची.मनसेने आंदोलनाला पाठींबा देऊन एक चांगले उदाहरण मांडले आहे . कारण आन्नाच्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा बरेच लोक प्रयत्न करीत आहेत आप आणि अण्णांच्या समर्थकांची लढाई होणे हे त्याचेच एक उदाहरण आहे.

close