अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान होणार वेगळे

December 13, 2013 9:37 PM0 commentsViews: 3576

hrithik roshan and suzanne divorce13 डिसेंबर : बॉलिवूडचा अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान आता वेगळे होणार आहेत. लग्नापूर्वीपासूनचं 17 वर्षांचं नातं संपवत असल्याची घोषणा हृतिकनं आज केलीय. माझ्या कुटुंबासाठी हा कठीण काळ आहे. मीडिया आणि लोकांना आमच्या खासगी आयुष्याचा आदर करावा, असं आवाहनही हृतिकने केलंय. धक्कादायक म्हणजे हृतिक रोशन आणि सुझान यांच्या लग्नाला 20 डिसेंबर रोजी लग्नाचा 13 वा वाढदिवस आहे.

गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन आणि सुझान यांच्यामध्ये वाद विकोपाला गेले होते. ह्रतिक अधिकाअधिक काळ घराबाहेर घालवत असल्यामुळे सुझान नाराज होती. तसंच सुझानच रोशन परिवाराशी सूर जुळत नसल्याचं बोललं जात आहे. सुझान गेल्या काही दिवसांपासून आपल्या माहेरीही जाऊन राहत होती.

मात्र अजूनही घटस्फोटाचं कारण कळू शकलं नाही. ‘कहो ना प्यार है’ या सिनेमातून हृतिकने सिनेसृष्टीत एंट्री केली. त्यानंतर 20 डिसेंबर 2000 साली हृतिक आणि सुझानने मोठ्या थाटामाटात लग्न केलं होतं. या दोघांना रेहान आणि रिधन ही दोन मुलं आहे. सुझान आणि ह्रतिक बालपणीचे मित्र आहे. सुझान ही इंटरियर डिझाईनर आहे.

हृतिकने आज एक निवेदन प्रसिद्ध करत आपण आणि सुझान वेगळं होतं असल्याचं जाहीर केलं. तसंच आपल्या चाहत्यांनी निराश होऊ नये. माझं लग्न संस्थेवर पूर्ण विश्वास असून आदर करतो. मी आजारी असतांना चाहत्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे असंही ह्रतिक म्हणाला. हृतिक आणि सुझान वेगळे होण्याच्या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहे.

close